नव्या हळदीला१५ हजार ३७७ रु. क्विंटल भाव; आजपासून आवक सुरू; गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात घट

गतवर्षी एप्रिलमध्ये काढणीच्या वेळी पाऊस आल्याने हळद भिजल्या गेली. त्यामुळे सुरुवातीला ५ हजार रूपये क्विंटलला दर मिळाला होता.
नव्या हळदीला१५ हजार ३७७ रु. क्विंटल भाव; आजपासून आवक सुरू; गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्नात घट

भास्कर जामकर/नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये रपासून नव्या हळदीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी काडी हळदीला १५ हजार ३७७ रूपये तर, बंडा हळदीला १३ हजार ३७७ रूपये क्विंटलला भाव मिळाला.

गतवर्षी हंगामामध्ये (एप्रिल) काढणीच्या वेळी पाऊस आल्याने हळद भिजल्या गेल्याने सरासरी पाच हजार रूपये क्विंटलला दर मिळाला होता. यंदा सुरूवात चांगली झाली असून, यंदा आवक कमी असल्याने आणखी दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक आपला माल विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणतात. बाजार समितीत नेहमी दहा ते बारा हजार हळदीचे कट्टे दाखल होतात. त्यांची एकाच दिवशी मोजणीही करण्यात येते.

दरम्यान, आजपासून हळदीची आवक सुरू झाली आहे. जवळा पांचाळ येथील शेतकरी शेख अहेमद यांनी कांडी व बंडा प्रकारातील ७० ते ७५ कट्टे हळद विक्रीसाठी आणली होती. ठक्कर ब्रदर्स यांनी हा माल खरेदी केला आहे, असे बाजार समितीचे बाबाराव शेळके यांनी सांगितले.

गतवर्षी एप्रिलमध्ये काढणीच्या वेळी पाऊस आल्याने हळद भिजल्या गेली. त्यामुळे सुरुवातीला ५ हजार रूपये क्विंटलला दर मिळाला होता. पुढे मे महिन्यात हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. एकाच दिवशी २० हजारच्या जवळपास हळदीचे कट्टे दाखल झाले होते. मोजणीसाठी तब्बल दोन दिवस लागले होते. बाजार समितीच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी हळदीला प्रति क्विंटल ८ हजार १०० रुपये तर, सरासरी सहा हजार ७०० ते सहा हजार ८०० रूपये इतका मिळाला होता. अवकाळी पावसाने चांगल्या प्रतीचा मालाचे प्रमाण कमी होते. बहुतांश शेतक-यांनी याच वेळी हळद विकून टाकली होती. पुढे हा दर थोड्याफार फरकाने कमी - जास्त होत १९ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत गेला आहे.

दर वाढण्याची शक्यता

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून हळदीची आवक सुरू झाली आहे. यंदा माल चांगला असून, आवक कमी असल्याने दरही आणखी वाढण्याची शक्यता आहे.

- कमलाकर बांडे, व्यापारी, नांदेड.

logo
marathi.freepressjournal.in