रेल्वे मार्ग ओलांडताना विद्यार्थिनीचा मृत्यू

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील १५ वर्षीय इयत्ता दहावीत शिकणाऱ्या वैष्णवी रावल या विद्यार्थिनीचा गुरुवारी दुपारी सफाळे रेल्वे फाटकात अपघात होऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
रेल्वे मार्ग ओलांडताना विद्यार्थिनीचा मृत्यू
Published on

पालघर : पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील १५ वर्षीय इयत्ता दहावीत शिकणाऱ्या वैष्णवी रावल या विद्यार्थिनीचा गुरुवारी दुपारी सफाळे रेल्वे फाटकात अपघात होऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तिच्या कानात इयरफोन चालू असल्यामुळे तिला गाडीचा हॉर्न ऐकू न आल्याने तिचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

वैष्णवी रावल असे या मुलीचे नाव असून ती इयत्ता १० वी मध्ये लेट चंद्रप्रभा चित्ररंजन श्रॉप इंग्लिश मीडियम हायस्कूल सफाळे या हायस्कूलमध्ये शिकत होती. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास ती सफाळे पश्चिम येथून सफाळे दिशेने रेल्वे क्रॉस करून सफाळे पूर्व येथे क्लासला जात होती.

यावेळी सफाळे रेल्वे येथून ती पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वे फाटक क्रॉस करत असताना पश्चिम एक्स्प्रेसच्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही मुलगी मूळची राहणारी गुजरात येथील असून ती काही वर्षांपासून नाइन स्टार पंडित पाडा कृतिका बिल्डिंग येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती.

logo
marathi.freepressjournal.in