रायगडमधील १५,००० लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र; ६१ लाभार्थ्यांचे अर्ज मागे; ITR भरणाऱ्यांना योजनेतून वगळणार, लाभार्थ्यांना २१०० रुपयांची प्रतीक्षा

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली.
रायगडमधील १५,००० लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र; ६१ लाभार्थ्यांचे अर्ज मागे; ITR भरणाऱ्यांना योजनेतून वगळणार, लाभार्थ्यांना २१०० रुपयांची प्रतीक्षा
Published on

धनंजय कवठेकर/रायगड

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार असा आर्थिक लाभ देण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ३३२ लाडक्या बहिणींना या योजनेत लाभ देण्यात येत आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ८४९ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत तर ६१ बहिणींनी स्वत:हून आपले अर्ज मागे घेतले आहे. मध्यंतरी या योजनेत ज्या महिला पात्र नाहीत, त्यांचा हप्ता रोखण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. तर काहींकडून वसुली केली जाणार असल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे काही महिलांनी स्वतःहून ही रक्कम न मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तर काहींचे अर्ज आधीच रिजेक्ट झाले आहेत.

दरम्यान, या योजनेतील लाभ कायम राहण्यासाठी आधार लिंक खाते क्रमांक देणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थी इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत असल्यास ते कळणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा २१०० रुपये करणार, असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते. राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते. मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता महिलांना मिळालेला नाही.

या योजनेत महिलांना दीड हजार रुपयांची मदत मिळणार असल्याने त्यांनी कोणताही विचार न करता अर्ज भरले. आयटीआर भरणाऱ्यांनीही यात अर्ज केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशांचा शोध लागल्यानंतर त्यांनाही या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

वाढीव हप्ता मिळण्याची आशा धुसर

सध्या महिलांना दीड हजार रुपये हफ्ता दिला जात आहे. यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने ४६ हजार कोटींची तरतूद केली होती. सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता मिळण्याची आशा धुसर झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in