राज्यात आणखी १५,००० मेगावॉट वीजनिर्मिती; पंप स्टोरेजसाठी तीन सामंजस्य करार; १८ हजार रोजगारनिर्मिती 

गुंतवणुकीत वाढ, रोजगार निर्मिती क्षेत्रात राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यापूर्वी ५५ हजार ९७० मेगावॉट वीज निर्मितीचा करार केला असून आणखी १५ हजार मेगावॉट वीज निर्मितीचा करार करण्यात आला आहे. यामुळे राज्यात ८२ हजार १९९ कोटींची गुंतवणूक होणार असून १८ हजार ४४० रोजगार निर्मिती होणार आहे.
राज्यात आणखी १५,००० मेगावॉट वीजनिर्मिती; पंप स्टोरेजसाठी तीन सामंजस्य करार; १८ हजार रोजगारनिर्मिती 
Published on

मुंबई :  गुंतवणुकीत वाढ, रोजगार निर्मिती क्षेत्रात राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. यापूर्वी ५५ हजार ९७० मेगावॉट वीज निर्मितीचा करार केला असून आणखी १५ हजार मेगावॉट वीज निर्मितीचा करार करण्यात आला आहे. यामुळे राज्यात ८२ हजार १९९ कोटींची गुंतवणूक होणार असून १८ हजार ४४० रोजगार निर्मिती होणार आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तीन कंपन्यांसोबत पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात हा करार करण्यात आला आहे.

उदंचन जलविद्युत प्रकल्पासंदर्भात सह्याद्री राज्य अतिथीगृहात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या जलसंपदा विभाग आणि एसजेव्हीएन लिमिटेड, जेएसडब्ल्यू एनर्जी लि. आणि मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रा लि. यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभाग व संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. पम्प्ड स्टोरेज सामंजस्य करारावर जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी आणि संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.

नवा प्रकल्प हा हरित ऊर्जा क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे. करारामुळे १५ हजार १०० मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. यापूर्वी ५५ हजार ९७० मेगावॉट वीज निर्मितीसाठी करार करण्यात आले आहेत. यामध्ये ३ लाख कोटींची गुंतवणूक आणि ९० हजार ३९० इतकी रोजगार निर्मिती  होत आहे. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

logo
marathi.freepressjournal.in