नवी दिल्ली : यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १५,५५४ कोटींची तरतूद केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली. मध्य रेल्वेला २०२४-२५ साठी १०६११.८२ कोटींची तर पश्चिम रेल्वेसाठी १८,०९३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथ २७५ कोटी
बारामती-लोणंद ३३० कोटी
वर्धा-नांदेड ७५० कोटी
सोलापूर-उस्मानाबाद व्हाया तुळजापूर २२५ कोटी
धुळे-नरडाणा ३५० कोटी
कल्याण-मुरबाड मार्गे उल्हासनगर १० कोटी
ब्रॉडगेजसाठी ३०० कोटी
पाचोरा-जामनेर ३०० कोटी
तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठी १६१५ कोटी
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका ८५ कोटी
वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका १२५ कोटी
वर्धा-बल्लारशहा तिसरी मार्गिका २०० कोटी
इटारसी-नागपूर ३२० कोटी
पुणे-मिरज-लोंढा (दुपदरीकरण) २०० कोटी
दौंड-मनमाड (दुपदरीकरण) ३०० कोटी
वर्धा-नागपूर (चौथी मार्गिका) १२० कोटी
मनमाड-जळगाव (तिसरी मार्गिका) १२० कोटी
जळगाव-भुसावळ (चौथी मार्गिका) ४० कोटी
वाहतुकीशी संबंधित कामे- २३६ कोटी
कर्जत-पनवेल व कर्जत-पळसदरी दरम्यान
चौथी मार्गिका १० कोटी
एलटीटी येथे कोचिंग सुविधा ५ कोटी
पनवेल-कळंबोली टर्मिनस १० कोटी
सीएसएमटी फलाटांचे विस्तारीकरण १० कोटी
पुण्यात फलाटांचा विस्तार २५ कोटी
गायगाव-यार्ड रिमॉडेलिंग ४.२५ कोटी
वर्धा-चितोडा ४ कोटी
इटारसी-जळगाव मार्गिका २५ कोटी
हडपसर टर्मिनल २ कोटी
अंजणी टर्मिनल ७.५ कोटी
एमयूटीपी-मुंबई महानगर वाहतूक प्रकल्प ७८९ कोटी
प्रवासी सुविधा १०२२ कोटी
रेल्वेमार्गिका सुधारणा १३२० कोटी
पूल, बोगदा बांधकाम १९२ कोटी
सिग्नल व टेलिकम्युनिकेशन १८३ कोटी
वीज प्रकल्प ३३८ कोटी
पुलांची उभारणी
विक्रोळी ५ कोटी
निफाड ५ कोटी
दिवा १८ कोटी
दिवा-वसई मार्गावर पूल ९ कोटी
दिवा-पनवेल मार्गावर पूल ३ कोटी
कल्याण-इगतपुरी मार्गावर पूल १६.१ कोटी