शिंदे गटाचे १६ आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात ; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

गेलेल्या सर्व पन्नास आमदारांना मंत्रिपद मिळणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्यामध्ये उद्रेक वाढत आहे
शिंदे गटाचे १६ आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात ; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे १६ आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात आहेत. ते मूळचे शिवसेनेचे आहेत. आपण उगीचच ‘मातोश्री’ आणि उद्धव साहेबांना सोडले असे त्यांना वाटत असून ते लवकरच शिवसेनेत दाखल होतील, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यांना ‘मातोश्री’ आणि उद्धवसाहेबांना सोडल्याचा पश्चाताप होत आहे. शिवसेनेने त्यांना मोठे केले. सरकार पडणार हे त्यांनाही माहित आहे. त्यामुळे हे सोळा जण शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असे खैर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गेलेल्या सर्व पन्नास आमदारांना मंत्रिपद मिळणे शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्यामध्ये उद्रेक वाढत आहे. त्यामुळे शिंदे गटातील हे आमदार ‘मातोश्री’च्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा खैरे यांनी केला.

भुमरेंवर साधला निशाणा

खैरे म्हणाले, भुमरेंना मंत्रिपद काय तेच समजत नाही. कुठल्या तरी पंचवीस लोकांच्या गावठी सभेत शिवसेनेचे दोन आमदार संपर्कात असल्याचे ते सांगतात.

भुमरेंचे प्रत्युत्तर...

चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तर देताना संदिपान भुमरे म्हणाले की, खैरे म्हणतात तसा मी गावठी मंत्री आहे, पण मी कुठेही काहीही बोलत नाही. खैरेंना ‘मातोश्री’वर कुणीही विचारत नव्हते. आम्ही उठाव केला म्हणून त्यांना किंमत मिळाली. खैरे म्हणजे या जिल्ह्याला लागलेली कीड आहे. त्यांनी या शहराची वाट लावली, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in