राज्यातील १७ मंत्री 'पीए'च्या शोधातच; बघा यादी

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक अर्थात पीएच्या निवडीचा शोध जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही १७ मंत्र्यांना त्यांच्या मनाजोगते पीए मिळालेले नाहीत.
राज्यातील १७ मंत्री 'पीए'च्या शोधातच; बघा यादी
नितेश राणे, गिरीश महाजन, आदिती तटकरे (डावीकडून)
Published on

मुंबई : जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे, तर पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक अर्थात पीएच्या निवडीचा शोध जवळपास पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापही १७ मंत्र्यांना त्यांच्या मनाजोगते पीए मिळालेले नाहीत.

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे, उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण यांना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे, अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी भूपेंद्र बेडसे यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे पीए म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

या मंत्र्यांना पीएची प्रतीक्षा

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड, प्रकाश आबिटकर, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, नितेश राणे, उदय सामंत, दादाजी भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिष शेलार, आदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर या मंत्र्यांना अद्याप पीएचा शोध सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in