अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय ‘वाघडोह’ या वाघाचा मृत्यू

अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय ‘वाघडोह’ या वाघाचा मृत्यू

चंद्रपुरातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय ‘वाघडोह’ या वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी ‘वाघडोह’ या वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ‘वाघडोह’ वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. १७ वर्षे वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी वाघाचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा वाघ वयस्कर असल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे त्याला अवघड झाले होते. हा वाघ चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मोठा आणि वयस्कर होता. तसेच त्याने सिनाळा गावालगत आपले बस्तान मांडले होते. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ‘वाघडोह’ वाघाचा वावर होता. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला ‘वाघडोह’ माणसे आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात घेता वन विभाग वाघावर नजर ठेवून होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in