अजित पवारांना बालेकिल्ल्याला सुरुंग? १८ माजी नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला

काल रात्री पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.
अजित पवारांना बालेकिल्ल्याला सुरुंग? १८ माजी नगरसेवक शरद पवारांच्या भेटीला

पुणे : वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षफुटीनंतर बहुतेक पक्षातील बहुतेक लोकप्रतिनिधींनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीनं ४८ पैकी ३० जागा जिंकल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर विजय मिळवला. या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. यासोबतच अजित पवारांसोबत गेलेले अनेक नेते, लोकप्रतिनिधी शरद पवार यांच्या संपर्कात असून त्यांची घरवापसी होऊ शकते, असं बोललं जात आहे. दरम्यान काल रात्री पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील मोदी बाग येथील शरद पवार यांच्या निवास्थानी ही भेट झाल्याचं वृत्त आहे.

वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. शरद पवारांपासून फारकत घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या पक्षफुटीनंतर बहुतेक पक्षातील बहुतेक लोकप्रतिनिधींनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही, तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं निर्णय देत पक्ष आणि पक्ष चिन्ह 'घड्याळ' अजित दादांना दिलं. या सर्व घटनांनंतर शरद पवारांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. परंतु शरद पवारांनी नव्यानं पक्षबांधणी केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीनं ४८ पैकी ३० जागांवर विजय मिळवल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 'तुतारी घेतलेला माणूस' या नव्या चिन्हावर लढलेल्या १० पैकी ८ जागा जिंकल्या आणि सर्वांना धक्का दिला.

दरम्यान लोकसभा निवडणूकीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुरतं ढवळून निघालं आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणूकीच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे बोललं जात होतं. लोकसभा निवडणूकीपूर्वी अजित पवार गटातून पुन्हा शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना पक्षानं उमेदवारी दिली आणि नगरमधून ते खासदार म्हणून निवडूनही आले. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपमधून पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत घरवापसी केली. या पार्श्वभूमीवर काल रात्री राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेल्या पिंपरी चिंचवड येथील १६ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे. पुण्यातील मोदी बाग येथील शरद पवार यांच्या निवास्थानी काल रात्री उशिरा ही भेट झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान शरद पवार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून या घटनेनं अजित पवार यांची डोखेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in