बँकांचे खासगीकरण, कामगार कायदे या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाचा सर्वाधिक फटका बँकिंग व्यवस्थेला बसला आहे. सोमवार आणि मंगळवार अशा दोन दिवसांत बँकिंग व्यवस्था ठप्प असल्याने देशभरातील जवळपास २० लाख धनादेश वटले नाहीत, असा दावा कामगार संघटनांनी केला आहे. यातून १८ हजार कोटींच्या व्यवहाराला फटका बसला आहे.