‘आयआयबी’च्या विद्यार्थ्यांना १८० पैकी १८० गुण

सर्व यशस्वीतांचा एका कार्यक्रमात आयआयबीच्या वतीने पालकांसमवेत गौरव करण्यात आला.
‘आयआयबी’च्या विद्यार्थ्यांना १८० पैकी १८० गुण

नीट-२०२२च्या निकालात आयआयबीने यावर्षी नवा उच्चांक प्रस्थापित करताना मागील वर्षीच्या ‘नीट’ परीक्षेच्या आपल्याच निकालाची परंपरा खंडित केली व पुन्हा एकदा ‘नीट’ परीक्षेत याही वर्षी अव्वल स्थान काबीज केले आहे. या परीक्षेत आयआयबीच्या अनिमेश राऊत ६९२ गुणांसह महाराष्ट्रात पहिला, तर पारस सूर्यवंशी ६९०, श्रुती वीर ६९०, आदित्य केंद्रे ६९०, गौरव शिंदे ६८५, सौरभ दुघे ६८१, सक्षम करंडे ६८०, हर्षल बोकाडे ६८० असे गुण प्राप्त करत यावर्षीच्या नीटच्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला. यासोबतच अवघड समजल्या जाणाऱ्या फिजिक्स विषयात गौरव शिंदे, अन्वेष गंगेवार, शर्वरी कवलकर, शिवम सूर्यवंशी आदी विद्यार्थ्यांनी १८० पैकी १८० गुण प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वीतांचा एका कार्यक्रमात आयआयबीच्या वतीने पालकांसमवेत गौरव करण्यात आला.

यावेळी गुणवंताच्या गौरव सभारंभाचे प्रास्ताविक आयआयबी पीसीबीचे अॅकॅडेमिक संचालक प्रा. वाकोडे पाटील यांनी, तर मार्गदर्शन संचालक डॉ. महेश पाटील यांनी केले आणि शेख सादिक यांनी आयआयबीच्या आत्तापर्यंतच्या यशाचा आढावा उपस्थितांच्या समोर मांडला. यासोबतच नीटमध्ये ५५० अधिक गुण मिळवणाऱ्या तब्बल ३७५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा गौरव आयआयबीने अनोख्या पद्धतीने केला.

गुणवंताच्या गौरव सोहळ्यासाठी व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीम आयआयबीच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले….

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in