भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेंढ्या ठार

मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एका गाडीने फरशीने भललेल्या उभ्या असलेलया गाडीला समोरुन धडक दिल्याने हा हा अपघात घडला आहे
भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेंढ्या ठार
Published on

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याजवळील माळेगावजवळ एका भीषण अपघातात पाच जणांसह 190 मेढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मेंढ्या घेऊन जाणाऱ्या एका गाडीने फरशीने भललेल्या उभ्या असलेलया गाडीला समोरुन धडक दिल्याने हा हा अपघात घडला आहे. मृतांमध्ये चार जण मध्य प्रदेशातील तर एक राजस्थानातील आहे.

राजस्थानहून 200 मेढ्यांनी भरलेली एक गाडी हैदराबादकडे निघाली होती. गुरुवार(25 मे) ला सकाळी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाला डूलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी गाडी माळेगाव फाट्याजवळ उभ्या असलेल्या एका फरशीने भलेल्या वाहनावर आदळली. या अपघातात गाडीतील तीन जण जागीच ठार झाले. गंभीर जखमी झालेल्या दोन जणांचा उपचारसाठी नांदेड येथे नेत असताना रस्त्यात मृत्यू झाला. या अपघात गाडीतील 200 पैकी 190 मेढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी नेले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in