
रामनवमीच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला होता. किराडपुरामधील राम मंदिरासमोर २ गटामध्ये झालेल्या या राड्यामध्ये पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक करत आग लावण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली असून आतापर्यंत ८१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, मंगळवारी पोलिसांनी त्या दिवशी पोलिसांच्या गाड्या जाळणामध्ये पुढे असणाऱ्या २ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किराडपुऱ्यामधल्या राड्यामध्ये गाड्या जाळण्यात पुढे असलेल्या दोघांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. सय्यद जुहूर सय्यद मोहीम आणि सय्यद इलियास सय्यद नाजेर अशी या दोघांची नावे आहेत. गेल्या २० दिवसणूहू अधिक काळ त्यांचा पोलीस शोध घेत होते. किराडपुरामध्ये झालेल्या या राड्यात १४ गाड्या जमावाने जाळल्या होत्या. त्यावेळी हे दोघेजण दुचाकीवरुन येताना आणि जाताना फुटेजमध्ये सीसीटीव्हीच्या कॅमेरात कैद झाले आहेत.