कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे मंगळवारी सायंकाळी स्फोट झाले. एकापाठोपाठ दहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याचे समजते.