Pune : भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; २ हजार अर्जांचे वाटप

आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अर्ज वितरणाला प्रारंभ झाला असून, पक्ष कार्यालयांमध्ये दोन दिवस अर्ज वाटपाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने इच्छुकांची झालेली गर्दी लक्षवेधी ठरली.
भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; २ हजार अर्जांचे वाटप
भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी; २ हजार अर्जांचे वाटप
Published on

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर अर्ज वितरणाला प्रारंभ झाला असून, पक्ष कार्यालयांमध्ये दोन दिवस अर्ज वाटपाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने इच्छुकांची झालेली गर्दी लक्षवेधी ठरली. उमेदवारीसाठी अर्ज वाटपाच्या पहिल्या दिवशी २ हजार अर्ज इच्छुकांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे संकेत पक्षाने दिले आहेत. ४१ प्रभागांतील १६५ पैकी १२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. याच उद्देशाने रणनीती आखण्यासह आगामी काळात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रत्येक प्रभागात चार जागांसाठी सुमारे २० जणांनी पुढाकार घेतल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील दोन-तीन सदस्यांनी स्वतंत्र अर्ज घेतल्याचेही पाहायला मिळाले.

दरम्यान, अन्य पक्षांकडून उमेदवारी अर्जांसाठी शुल्क आकारले जात असताना भाजपने मात्र अर्ज विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी प्रत्येकी १० हजार शुल्कासह अर्ज वाटप केले असून, त्यांना २६० अर्ज प्राप्त झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटानेही १० हजार ५०० रुपये शुल्क आकारत आतापर्यंत २०० अर्ज वाटप केले आहेत.

अर्ज वितरणाबाबत बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, ‘आज आणि उद्या असे दोन दिवस पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध आहेत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, प्रत्येक प्रभागातून ५० ते ६० अर्ज येत आहेत. विचारपूर्वक निवड प्रक्रिया पार पाडून उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. पुण्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.’

भाजपाच्या उमेदवारी अर्जांना मिळालेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे निवडणुकीत रंगत वाढणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in