गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वेगाड्या! आजपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे. विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण रविवारपासून सुरू होणार आहे.
गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वेगाड्या! आजपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार
Published on

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून २०२ गणपती विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचे मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे. विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण रविवारपासून सुरू होणार आहे. या विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांचे आरक्षण न मिळालेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सवाला यंदा ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील भाविक मोठ्या संख्येने कोकणात जातात. भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे दरवर्षी विशेष गाड्या चालविण्यात येतात. तसेच नियमित गाड्याही प्रवाशांच्या सेवेसाठी असतात. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांनी नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण केले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाले आहे. अशा प्रवाशांना विशेष रेल्वेगाड्यांमुळे दिलासा मिळणार आहे.

१ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान विशेष रेल्वेगाड्या

सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी (३६ फेऱ्या)

सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी (३६ फेऱ्या)

एलटीटी-कुडाळ-एलटीटी (३६ फेऱ्या)

एलटीटी-सावंतवाडी रोड-एलटीटी (३६ फेऱ्या)

एलटीटी-कुडाळ-एलटीटी त्रि-साप्ताहिक विशेष (१६ फेऱ्या)

एलटीटी-कुडाळ-एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)

दिवा-चिपळूण-दिवा मेमू अनारक्षित विशेष (३६ फेऱ्या)

logo
marathi.freepressjournal.in