कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास २२१.५१ कोटींचा निधी ;माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती मागणी

एमएडीसीने कराड विमानतळाच्या विकास व विस्तार कामांसाठी सादर केलेल्या २२१.५१ कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
कराडच्या विमानतळ विस्तारीकरणास २२१.५१ कोटींचा निधी ;माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती मागणी

कराड : येथील एमएडीसी अंतर्गत असणाऱ्या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य सरकारकडून २२१.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता दिली असल्याचा शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे. पावसाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे कराड दक्षिणचे पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानतळ विस्तारिकरणांबाबतचा प्रश्न सभागृहात उपस्थित करत यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने हा निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यावेळी आ.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, हाराष्ट्रातील तालुका ठिकाणचं पहिलं विमानतळ कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलं होतं कारण कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कराड विमानतळ विस्तारीकरणासाठी तेथील ग्रामस्थांचा विरोध नसून त्याबाबत योग्य तो निधी त्यांना हवा आहे यासाठी राज्य शासनाकडून त्वरित तोडगा काढण्याची अपेक्षा आहे. या आ. चव्हाण यांच्या मागणीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय मिटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार २० ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत एमएडीसीने कराड विमानतळाच्या विकास व विस्तार कामांसाठी सादर केलेल्या २२१.५१ कोटी रुपयांच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in