२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव जळगावला

समारोपाच्या सत्रात पं. आदित्य ओक व निनाद मुळावकर यांच्या संवादिनी व बासरी जुगलबंदीने २२ व्या बालगंधर्व महोत्सवाची सांगता होईल
२२ वा बालगंधर्व संगीत महोत्सव जळगावला
PM

जळगाव : भारतीय अभिजात संगीताचा खानदेशचा सांस्कृतिक मानदंड ठरलेल्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २२व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन ५, ६, ७ जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत बोलतांना दिली आहे.

येथील छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणाऱ्या या संगीत महोत्सवात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलावंतांना प्रतिष्ठानाने निमंत्रित करण्यात आलेले आहे.

महोत्सवाची सुरुवात ५ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभानंतर प्रथम सत्रात गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. द्वितीय सत्रात लखनऊ घराण्याचे प्रतिनिधित्व करणारे कै. पंडित अर्जुन मिश्रा यांचे चिरंजीव व स्नुषा अनुज मिश्रा व नेहा मिश्रा यांची कथक जुगलबंदी सादर होईल.

दि. ६ रोजी द्वितीय दिनाच्या प्रथम सत्रात मुंबईच्या एक अत्यंत गुणी व प्रतिभासंपन्न गायिका रौकिणी गुप्ता या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील. द्वितीय सत्रात रागा फ्युजन बँडचे सादरीकरण तमाम जळगावकर रसिकांसाठी होणार आहे.

दि. ७ रोजी तृतीय दिनाचे प्रथम सत्र हे सहगायनाने संपन्न होणार असून, पं. राजन साजन मिश्रा यांची पुढची पिढी अर्थात पं. रितेश व पं. रजनीश मिश्रा यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय युगल गायनाने संपन्न होईल. समारोपाच्या सत्रात पं. आदित्य ओक व निनाद मुळावकर यांच्या संवादिनी व बासरी जुगलबंदीने २२ व्या बालगंधर्व महोत्सवाची सांगता होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in