बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले
बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू ; मुख्यमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीने पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. बसला आग लागल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जण जखमी झाले आहेत. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

अपघातानंतर तत्काळ यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र बसला आग लागल्याने बसमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत आहे. काही वेळा वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात होत आहेत. 

प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी चालकांची आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अपघाताला कारणीभूत असलेल्या गोष्टींवर योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात झाला. 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले. 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावेळी रात्री दीडच्या सुमारास ही भीषण घटना घडली. अपघातग्रस्त बस नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. ही बस नागपूर, वर्धा, यवतमाळ येथून प्रवासी घेऊन जात होती. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्यानंतर बसने पटकन पेट घेतला. त्यानंतर बसमधील ३३ प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरूप बाहेर पडले. 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बचावलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील बहुतांश प्रवासी नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in