अहमदाबादमध्ये कारने २५ जणांना चिरडले

९ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी १६० किमी वेगाने आलेल्या कारने गर्दीला धडक दिली
अहमदाबादमध्ये कारने २५ जणांना चिरडले
Published on

अहमदाबाद : येथील इस्कॉन ब्रीजवर बुधवारी रात्री एका भरधाव कारने २५ जणांना चिरडले. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू, तर १५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल व होमगार्डच्या जवानाचा समावेश आहे. ही टक्कर इतकी भयानक होती की, लोक ३० फूट दूर जाऊन पडले. या ब्रीजवर एक कार डंपरला पाठीमागून धडकली होती. ते पाहण्यासाठी गर्दी जमली होती. तेव्हा १६० किमी वेगाने आलेल्या कारने गर्दीला धडक दिली. या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला.

वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितले की, या अपघातातील कारचा चालक जखमी झाला असून, त्याला ‘सिम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला उपचारानंतर अटक केली जाणार आहे. ही कार तथ्य पटेल हा तरुण चालवत होता. त्याचे वय १८ ते १९ असावे. तथ्यचे वडील प्रग्येश पटेल हे सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी होते. या घटनेनंतर आरोपी चालकाचे पूर्ण कुटुंब गायब झाले आहे. या दुर्घटनाग्रस्त कारमध्ये एक मुलगा व मुलगी उपस्थित होते. घटनास्थळी संतप्त जमावाने त्यांना मारहाण केली. मात्र, काही जणांनी त्यांना वाचवले आहे.

logo
marathi.freepressjournal.in