जळगावला नऊ महिन्यांत २५४ एचआयव्ही बाधित

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली
जळगावला नऊ महिन्यांत २५४ एचआयव्ही बाधित
Published on

जळगाव : जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२३ पर्यंत १ लाख ६४ हजार ७९० इतक्या सामान्य लोकांची एच.आय. व्ही तपासणी केला असता त्यामध्ये २३८ रुग्ण एच.आय.व्ही संसर्गित आणि १ लाख १४ हजार ४०२ इतक्या गरोदर मातांची एच.आय.व्ही तपासणी मध्ये १६ गरोदर महिला एच.आय.व्ही संसर्गित असलेल्या आढळून आल्या आहेत, अशी माहिती एडस नियंत्रण कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर यांनी दिली.

जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील,  जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, डॉ. आकाश चौधरी, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत वेगवेगळ्या विविध गटांमध्ये कार्यरत सामाजिक संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in