भांडारगृहाचे कुलूप तोडून २५४ किलो तांदूळ चोरला

देगलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे ८ रोजी सायंकाळी ४ ते ९ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान, चोरट्याने भंडार गृहाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला
भांडारगृहाचे कुलूप तोडून २५४ किलो तांदूळ चोरला

नांदेड : शाळेतील भांडारगृहाचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५४ किलो तांदूळ चोरून नेल्याची घटना देगलूर येथे घडली आहे. यासंबंधी मुख्याध्यापक बल्लीयोदीन अब्दुल हाबमुजावर (५५) यांनी पोलिसांत तक्रार दिली. देगलूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळा येथे ८ रोजी सायंकाळी ४ ते ९ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान, चोरट्याने भंडार गृहाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. आतील पोषण आहाराचे ७ हजार ११० रुपये किमतीचे २५४ किलो तांदूळ चोरून नेला.

logo
marathi.freepressjournal.in