चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २५५३ फेऱ्या

गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या २५५३ फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या २५५३ फेऱ्या
Published on

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी गुरुवारपासून एसटीच्या २५५३ फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.

जिल्ह्यात गणेशोत्सव सण मोठ्या जल्लोषात सुरू आहे. गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन होणार असून त्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागतील. एसटी महामंडळाने जादा फेऱ्यांद्वारे मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे येथे जाण्याकरिता जवळपास २५५३फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन बुकिंगप्रमाणे यावर्षी ग्रुप बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुहागर तालुक्यातून ग्रुप बुकींगला सर्वाधिक म्हणजे २०८ गाड्यांचे बुकिंग करण्यात आले आहे. दि. १९ व २० सप्टेंबरला सुध्दा फेऱ्या सोडण्यात येणार असून त्याचे आरक्षण सुरू आहे. या परतीच्या प्रवासाकरिता प्रत्येक आगारात अन्य आगारातून आलेल्या जादा एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बाहेरील आगारातून आलेल्या ७३५ बसेस, जिल्ह्यातील १०८ बसेसच्या माध्यमातून २५५३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

परतीच्या प्रवासाचे नियोजन

तारीख बसेस/ फेऱ्यांची संख्या

दि. १२ सप्टेंबर १८७ बसेस

दि. १३ सप्टेंबर ८३२ बसेस

दि. १४ सप्टेंबर ९२९ बसेस

दि. १५ सप्टेंबर ३३१ फेऱ्या

दि. १६ सप्टेंबर १०८ फेऱ्या

दि. १७ सप्टेंबर ८३ फेऱ्या

दि. १८ सप्टेंबर ८० फेऱ्या

logo
marathi.freepressjournal.in