कोल्हापुरनजीक एकाच ;कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली
कोल्हापुरनजीक एकाच ;कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू, ९ जण जखमी
Published on

कोल्हापूर : गोव्याहून मुंबईकडे जाणारी स्लीपर बस कोल्हापूर- राधानगरी मार्गावर पुईखाडी येथे उलटून झालेल्या अपघातात एका कुटुंबातील ३ जण छर झाले तर ९ जण जखमी धाले.

गुरुवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बसमधून एकूण २५ प्रवासी प्रवास करीत होते, अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने दिली. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनसह घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर सध्या कोल्हापुरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. बसचा चालक कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील पुईखडीजवळ वळण घेण्याचा प्रयत्न करत असताना बस उलटली, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in