मंदिरातील दानपेटी फोडून ३० हजारांची रोकड लंपास

दिरातील महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट मौल्यवान होता.
मंदिरातील दानपेटी फोडून ३० हजारांची रोकड लंपास

नांदेड : अर्धापूर तालुक्यातील लहान येथील श्री क्षेत्र बसवेश्वर मंदिरातील दानपेटी फोडल्याचा प्रकार १९ जानेवारी रोजी रात्री घडला. श्री क्षेत्र बसवेश्वर संस्थान लहान येथील मंदिराच्या प्रवेशद्वाराचा कडी कोंडा व कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मंदिरातील नंदी जवळ ठेवलेल्या दानपेटीचे कुलूप तोडून ३०हजार रुपये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उपाध्यक्ष हारकरी यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार संदिप आनेबोईनवाड तपास करीत आहेत. याचा मंदिरातील महादेवाच्या पिंडीवरील पंचधातूचा मुकुट मौल्यवान होता. त्याची चोरी दहा वर्षापूर्वी झाली; पण अद्याप तपास लागला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in