सोलापूरजवळील बस अपघातात ३५ जण जखमी ;चौघांची प्रकृती गंभीर

गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे
सोलापूरजवळील बस अपघातात ३५ जण जखमी ;चौघांची प्रकृती गंभीर

सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात ३५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी १०.३०च्या सुमारास देशमुख शेतालगत बस पलटी होऊन ही दुर्घटना घडली. या बसमध्ये जवळपास ७० प्रवासी प्रवास करत होते. चार ते पाच प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ झालेल्या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या.

अपघातानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन करून अपघाताची माहिती दिली. अपघातात जखमींना मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनाही तत्काळ जखमींची भेट घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in