तिसरी ते बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा जाहीर

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार केला आहे.
संग्राहित छायाचित्र
संग्राहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार केला आहे. या आराखड्यानुसार तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा गुरुवार २३ मेपासून नागरिकांसाठी जाहीर करण्यात येणार आहे. परिषदेच्या http://www.maa.ac.in/ या वेबसाईटवर हा मसुदा उपलब्ध असेल.

राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यावर सर्व समाज घटक, शिक्षक, पालक आणि शिक्षणतज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन आपले अभिप्राय पाठवू शकतात. यासाठी ३ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अभिप्राय नोंदविताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा आदी तपशील देणे आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in