राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ४% महागाई भत्तावाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा अध्यादेश बुधवारी जारी केला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ
ANI
Published on

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ४% महागाई भत्तावाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून तसा अध्यादेश बुधवारी जारी केला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ थकबाकीसह जुलै महिन्याच्या वेतनात रोखीने दिली जाणार आहे.

राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणे, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात, राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली दि. १० जून, २०२४ रोजी, तर मुख्यमंत्र्यांसमवेत दि. २८ जून, २०२४ रोजी अधिकारी महासंघाच्या बैठका पार पडल्या. सदर बैठकांत केंद्राप्रमाणे १ जानेवारी, २०२४ पासून ४% महागाई भत्ता वाढ थकबाकीसह मंजूर करण्याची आग्रही मागणी अधिकारी महासंघ पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावर सत्वर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य सचिव तसेच मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in