‘त्या’ ४० आमदारांची घरवापसी - वडेट्टीवार

अजित पवार गट आणि शिंदे गटातील जवळपास ४० आमदार पुन्हा घरी परतणार आहेत, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
‘त्या’ ४० आमदारांची घरवापसी - वडेट्टीवार
Twitter/@VijayWadettiwar

मुंबई : भाजप आधी जवळ घेते, त्यानंतर त्या पक्षाला पूर्ण संपवते, हे आता अजित पवार यांना उशिरा कळले. महिनाभर वाट पाहा. अजित पवार गट आणि शिंदे गटातील जवळपास ४० आमदार पुन्हा घरी परतणार आहेत, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत मविआने दिमाखदार कामगिरी केली आहे. शिंदे व अजित पवार गटातील आमदारांवर गद्दारीचा शिक्का बसला आहे. त्यामुळे या आमदारांना निवडणुकीत काय होणार याची चिंता लागून राहिली आहे. तसेच त्यांचे परतीचे दोर कापले गेले आहेत, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in