आज (१२ऑक्टोबर) पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जनआक्रोश पदयात्रेला सुरुवात झाली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. मागील हंगामातील उसाला प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागमीसाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.
गत हंगामातील साखरेला चांगला दर मिळाला आहे. तसंच इथेनॉलपासून कारखान्यांना चांकलं उत्पन्न मिळालं आहरे. मात्र, कारखानदारांनी केवळं. एफआरपीनुसार देयके अदा केली आहेत. अतिरिक्त उत्पन्नातील वाटा म्हणून प्रतिटन ४०० रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, त्याशिवाय कारखाने सुरु करु देणार नाही, असा इशारा यावेळी स्वाभीमानीचे अध्यक्षा राजू शेट्टी यांनी दिला.
सांगली येथून सुरु झालेली जन आक्रोश पदयात्रा ही विविध कारखान्यांवर जाऊन आपली मागणी खारखानदारांना सांगणार आहे. २२ दिवसात ६०० किमी असा या जन आक्रोश यात्रेचा प्रवास असणार आहे. १ नोव्हेंबर रोजी कुंडल येथे कोल्हापूर येथून निघालेल्या जनआक्रोश यात्रेचा मिलाफ होणार आहे. या दरम्यान, सांगलीतील जनआक्रोश पदयात्रा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आरग, कवठे महांकाळ, उदगिरी सोनहिरा, तासगाव, विटा या कारखान्यावरुन कुंडल येथे येणार असून याच दरम्यान दत्त कारखाना येथून निघालेली शेट्टी यांच्या नेतृदत्वाखालील पदयात्रा ही कुंडल येथे येणार आहे. या दोन्ही पदयात्रा एकत्र येऊन क्रांती हुतात्मा आणि राजारामबापू कारखान्यावर जाणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत होणार आहे.