राज्यातील ४५ लाख घरकामगारांचा संपाचा इशारा, 'या' आहेत मागण्या

कोविड महामारीच्या काळात घरेलू कामगारांवर खूप मोठे आर्थिक आरिष्ट्य ओढवलेले होते. घर कामगारांना त्यांचा काम करण्याचा अधिकारच नाकारला गेला होता.
राज्यातील ४५ लाख घरकामगारांचा संपाचा इशारा, 'या' आहेत मागण्या
Published on

मुंबई : राष्ट्रीय घरकामगार चळवळ आणि महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने राज्यातील ४५ लाख घरकामगार संपावर जाणार असल्याचा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत कॉम्रेड उदय भट यांनी दिला.

राज्यातील ४५ लाख घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व इतर अधिकार मिळावेत. यासाठी वेळोवेळी आंदोलन केले; मात्र सरकारने फक्त आश्वासन देऊन बोळवण केली.

कोविड महामारीच्या काळात घरेलू कामगारांवर खूप मोठे आर्थिक आरिष्ट्य ओढवलेले होते. घर कामगारांना त्यांचा काम करण्याचा अधिकारच नाकारला गेला होता. कोविडसारख्या या महामारीने कामगारांना सामाजिक सुरक्षेचे महत्त्व, त्यांचे श्रमिक म्हणून हक्क काय याची चांगलीच जाणीव करून दिली. त्या जाणिवेच्या आधारावर घरेलू कामगारांचा लढा नव्याने उभा राहत असल्याने सरकारने याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, असे मंगला बावस्कर, शांता खोत, सुनंदा गुंजाळ, शालिनी भोसले, कमल साळुंखे या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या क्षेत्रात आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने शासनाने त्याची दाखल घेऊन त्याच्या निर्मूलनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. असे सांगत ज्ञानेश पाटील व राजू वंजारे म्हणाले, घरेलू कामगारांचा रोजगार या नावाने, अनुसूचित रोजगाराच्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट करत तशी अधिसूचना शासनाने निर्गमित केली होती आणि त्याच्या अंतिम अधिसूचनेचा मसुदा सादर केला होता. पण रोजगाराची अंतिम सूचना अजून प्रसिद्ध झालेली नाही. ती प्रसिद्ध करावी अशी त्यांनी मागणी केली.

logo
marathi.freepressjournal.in