‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा

‘लाडकी बहीण’ योजनेत २६ लाख महिलांना वगळून ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. सरकारने पुरुषांनी पैसे काढल्याचा दावा केला असला तरी कोणत्या पुरुषांनी हे केले आणि त्यावर काय कारवाई झाली याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
‘लाडकी बहीण’ योजनेत ४,९०० कोटींचा भ्रष्टाचार; सुप्रिया सुळे यांचा फडणवीस सरकारवर निशाणा
Published on

कराड : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेत आत्तापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले असून, ४,९०० कोटींचा भष्ट्राचार झाला आहे, असे आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, सरकार म्हणते की हे पैसे पुरूषांनी काढले, परंतु कोणत्या पुरूषांनी काढले आणि त्यावर काय कार्यवाही झाली, याचे उत्तर सरकारने द्यावेच लागेल.

खासदार सुळे कोल्हापूर दौऱ्यावर असल्यामुळे सोमवारी सायंकाळी उशिरा कराड येथे आल्या. त्या विरंगुळा व वेणूताई चव्हाण स्मारक येथे भेट दिली आणि पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. या दरम्यान, स्व. वेणूताई चव्हाण ट्रस्टमध्ये काही मोजक्या पत्रकारांशी बोलताना, त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

सुळे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत आत्तापर्यंत राज्यातील २६ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. सरकार म्हणते की पैसे पुरूषांनी काढले, पण ते कोण आहेत, हे स्पष्ट करत नाही. ज्या महिलांची नावे योजनेतून वगळली गेली, त्या महिलांना आधी कसे समाविष्ट केले गेले, तेव्हा कोणते निकष लावले गेले, आत्ता कोणत्या निकषांवर त्यांना योजनेचा लाभ नाकारला जातो, याची माहिती सरकारने द्यावी असे आवाहन केले.

कोल्हापूर श्री महालक्ष्मी देवीचे घेतले दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोल्हापूर शहराला भेट देऊन येथील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर येथे देवीचे दर्शन घेतले. या दौऱ्यात सुप्रिया सुळे यांनी पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. त्यांच्या सोबत स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार सुळे यांनी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्याबरोबर माध्यमांशी संवाद साधत राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरही मत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्यात झालेली दिरंगाई, पुण्यासह महाराष्ट्रातील इन्फ्रास्ट्रक्चरची समस्या, शक्तिपीठ महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची उपलब्धता, तसेच राज्यातील ‘संस्कृती बचाव मोर्चा’ या विषयांवर स्पष्ट मत मांडले. तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरांमुळे शेतकरी अडचणीत आहेत. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, त्यांनी राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आरक्षणावर सविस्तर चर्चा होऊन निर्णय व्हावा

मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजांना आरक्षण मिळावे, हीच मागणी आहे. मराठा समाजाचे अधिकार दुर्लक्षित होत नाहीत. आरक्षणासाठी संसदेत सर्वात जास्त वेळा मागणी राष्ट्रवादीने केली आहे. देशभरातील सर्व समाजांच्या मागण्या एकत्र करून व्यापक बील मांडले जावे, त्यावर सविस्तर चर्चा होऊन निर्णय व्हावा, अशी भूमिका मी संसदेत घेतली आहे.

logo
marathi.freepressjournal.in