
मुंबई : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.
पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथून वऱ्हाड घेऊन जाणारी ही बस महाडमधील बिरवाडी येथे जात होती. एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती उलटली. त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले. त्यांना माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे संगीता जाधव, गौरव दराडे, शिल्पा पवार आणि वंदना जाधव अशी आहेत, तर पाचव्या मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.