बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख, तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार - मुख्यमंत्री

या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.
बुलढाणा बस अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाख, तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार - मुख्यमंत्री

बुलढाण्या जिल्ह्यातील मलकापूर शहरातील उड्डाण पुलावर दोन खासगी बस एकमेकांना समोरासमोर धडकल्याने झालेल्या अपघातत ६ भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर २५ जणांना गंभीर दुखापत झाली. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी प्रवाश्यांवर योग्य ते उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सुचना देखील प्रशानसनाला दिल्या.

अमरनाथहून हिंगोली जाणाऱ्या लक्झरी बसला एका दुसऱ्या भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने समोरुन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अतीगंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना बुलढाणा येथे हलवण्यात आलं आहे. मात्र, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाण पुलावर आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

हिंगोलीतील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस अमरनाथहून ४० प्रवाशांना घेऊन हिंगोलीकडे परत जात होती. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या बसने हिंगोली जाणाऱ्या बसला समोरुन धडकी दिली. या अपघातात हिंगोलीला परत असलेल्या बस मधील पाच प्रवासी हे जागीच ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. यामुळे महामार्गावर काही काळ चक्का जाम झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in