फडणवीसांच्या उपस्थितीत तयार झाला ६ टन हलवा; तयार केली जगातील सर्वात मोठी कढई

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता
फडणवीसांच्या उपस्थितीत तयार झाला ६ टन हलवा; तयार केली जगातील सर्वात मोठी कढई

नागपूर : श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्रातील कोराडी स्थित श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात सहा हजार किलो म्हणजे सहा टन हलवा तयार करण्यात आला. त्या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता, अशी माहिती स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. रामजन्मभूमीत श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना एक ऐतिहासिक घटना म्हणून सहा हजार किलो हलवा तयार करण्यात आला. जगातील सर्वात मोठ्या कढईत हा हलवा शिजविण्यात आला. या कढईचे वजनच सात हजार किलो आहे. हलव्याचे वजन जरी सहा हजार किलो असले तरी अन्य पदार्थांसह त्याचे एकूण वजन सात हजार किलो आहे. हलवा तयार करण्याचा हा एक नवा विक्रम आहे. ही कढई नंतर अयोध्येला पाठवण्यात येणार आहे. तेथे या कढईत रामलल्लासाठी प्रसाद तयार करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in