कापूस शेती, उद्योगातून ६५ लाख रोजगार : गोयल

देशात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादनाचा सामना यंदा करावा लागणार नाही.
कापूस शेती, उद्योगातून ६५ लाख रोजगार : गोयल

भारतीय कापूस शेती, कापूस प्रक्रिया, कापडनिर्मिती आणि निर्यात क्षेत्रातून ६५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होत असते, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केले. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात गोयल यांनी व्हीडिओ संदेश पाठवला.

कॉटन असोसिएशन भारतातून वाढता व्यापार आणि निर्यात हा एक जगाला संदेश आहे. नव्या भारताकडे जग एक विश्वसनीय सहकारी म्हणून पाहू शकतो. नव्या आव्हानांसाठी भारत नेहमीच सज्ज असतो. कापूस आणि वस्त्रोद्योग उत्पादकांनी टिकावू तंत्रज्ञान आत्मसात करावे, त्यासाठी सरकारी संशोधन संस्थांची मदत घ्यावी, असा सल्लाही गोयल यांनी दिला. यावेळी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव रुप राशी, कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट अतुल गणात्रा, वस्त्रोद्योग सचिव रुप राशी, प्रदीप कुमार अगरवाल, भूपेंद्र सिंग राजपाल, बीएसईचे समीर पाटील, सुरेश कोटक, टी. राजकुमार, वीणा आर. श्रीनिवास, चीफ पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल आणि स्वाती पांडे, पोस्टमास्टर जनरल, मुंबई रिजन यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

देशात कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत कमी उत्पादनाचा सामना यंदा करावा लागणार नाही. यंदा देशातील कापसाचे उत्पादन ३४४ लाख गाठी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी व्यक्त केला.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर येथे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शताब्दी महोत्सवात गणात्रा बोलत होते. या महोत्सवाला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयुष गोयल उपस्थित राहणार होते. परंतु त्यांनी व्हीडिओ संदेशाद्वारे देशभरातून आलेल्या उद्योजक, शेतकरी आणि पुरवठादारांना मार्गदर्शन केले. या वेळी तीन शेतकऱ्यांचा आणि संशोधकांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in