चंद्रपुरात ६८५३ मतदार नोंदणी अर्ज बाद; पोलिसांत तक्रार दाखल

ऑनलाईन मतदार नोंदणी करताना चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ६८५३ मतदारांच्या नावांच्या अर्जांची चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे आढळून आल्याने हे सर्व अर्ज बाद करण्यात आले आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
Published on

चंद्रपूर : ऑनलाईन मतदार नोंदणी करताना चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे ६८५३ मतदारांच्या नावांच्या अर्जांची चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे आढळून आल्याने हे सर्व अर्ज बाद करण्यात आले आहेत. तसेच याप्रकरणी चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून रितसर पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, निवडणूक आयोगाने ऑनलाईन मतदार नोंदणी अर्ज भरण्याची विशेष मोहीम राबवली होती. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यात आले. या अर्जांची पडताळणी केली असतो, काही अर्ज छायाचित्राशिवाय तर काहींमध्ये जन्म तारखांची नोंद करण्यात आली नव्हती. बऱ्याचशा अर्जामध्ये वास्तव्याचा पुरावा दिला नव्हता तर काहींनी चुकीची माहिती दिल्याचे आढळून आले. अशा चुकीच्या अर्जांची संख्या ६८५३ आहे.

अर्जांची पडतळणी केल्यानंतर ६८५३ अर्ज रद्द करून राजुरा विभागाचे एसडीओ आणि मतदार नोंदणी अधिकारी रवींद्र माने यांनी यासंदर्भात पोलिसांत रीतसर तकार दाखल केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in