पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला जालन्याजवळ अपघात; जीप विहिरीत कोसळून ७ ठार, ३ जण जखमी

पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या जीपला जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ अपघात होऊन त्यात ७ जण जागीच ठार झाले, तर ३ जण जखमी झाले आहेत.
पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला जालन्याजवळ अपघात; जीप विहिरीत कोसळून ७ ठार, ३ जण जखमी
प्रातिनिधिक फोटो
Published on

जालना : पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या जीपला जालना-राजूर मार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ अपघात होऊन त्यात ७ जण जागीच ठार झाले, तर ३ जण जखमी झाले आहेत. भरधाव असलेल्या जीपवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप थेट रस्त्याच्या कड्याला असलेल्या विहिरीत कोसळून हा अपघात घडला.

अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या जीपमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त जीप ही जालन्यातून राजूरच्या दिशेने जात होती. राजूरकडे जाताना मार्गावरील तुपेवाडी फाट्याजवळ गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत थेट कोसळली. या विहिरीला सिमेंटचा कठडा नसल्याने जीप थेट पाण्यात पडली. त्यावेळी आजूबाजूच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या लोकांनी तत्काळ तेथे धाव घेतली व बचावकार्य सुरू केले. नंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी स्थानिकांच्या मदतीने ७ मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्या तीनजणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in