जयश्रीच्या कुटुंबातील ७ जण ढिगाऱ्याखाली !

मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते
जयश्रीच्या कुटुंबातील ७ जण ढिगाऱ्याखाली !

इरशाळवाडी (खालापूर): सध्या पनवेल येथे आश्रमात राहून १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या जयश्री किशन वाघ हिचे अख्खे कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकलं आहे. सात जणांच्या या कुटुंबातील एकाचीही तिला माहिती मिळालेली नाही. जयश्री ही पनवेलला राहत असल्याने ती या दुर्घटनेतून बचावली. तिच्या कुटुंबातील कुणीही थांगपत्ता लागत तिच्या डोळ्यातील पाणी अश्रूंचा महापूर सुरू आहे. जयश्रीचे आई, वडील, आजी, आजोबा, लहान भाऊ, आत्या आणि आत्याचा मुलगा असे एकूण ७ जण ढिघाऱ्याखाली अडकले आहेत. जयश्रीचे वडील मजुरी करतात. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी तिला पनवेल येथील आश्रमात टाकले होते.

logo
marathi.freepressjournal.in