चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस, उबाठा सेनेला खिंडार; ८ नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी काँग्रेस आणि उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गोडपिंपरी नगरपंचायतीमधील १७ पैकी ८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस, उबाठा सेनेला खिंडार; ८ नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस, उबाठा सेनेला खिंडार; ८ नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशसंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात सोमवारी काँग्रेस आणि उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गोडपिंपरी नगरपंचायतीमधील १७ पैकी ८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित होते.

उबाठा गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख बंडू हजारे, उपजिल्हा प्रमुख नितीन पत्रुजी धानोरकर, उबाठा गट उपाध्यक्षा सारिका मडवी, उबाठा नगरसेवक यादव बोबडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस नगरसेवक सुनिल संकुलावर, सभापती वनिता वाघाडे, नगरसेविका वनिता देवगडे, सभापती रंजना रामगीरकार, सचिन चितावार, अपक्ष नगरसेवक सुरेश चिलणकार, तारडा येथील सरपंच तरुण उमरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in