मोठी बातमी : उन्हाळी विशेष गाड्यांच्या आणखी ८८ फेऱ्या चालवण्याचा निर्णय

एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळी सुट्ट्यांसाठी बहुतांश नागरिक गावी अथवा पर्यटन स्थळी जातात
मोठी बातमी : उन्हाळी विशेष गाड्यांच्या आणखी ८८ फेऱ्या चालवण्याचा निर्णय

एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळी सुट्ट्यांसाठी बहुतांश नागरिक गावी अथवा पर्यटन स्थळी जातात. पाहता मध्य रेल्वेने यंदा ७ उन्हाळी विशेष गाड्यांच्या आणखी ८८ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सीएसएमटी-नागपूर साप्ताहिक विशेष गाडीच्या १० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र ०१०३३ साप्ताहिक सुपरफास्ट सीएसएमटी येथून दर शनिवारी ६.मे ते ३ जूनपर्यंत ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूरला पोहोचेल. तर गाडी क्र ०१०३४ साप्ताहिक सुपरफास्ट ३० एप्रिल ते २८ मे पर्यंत दर रविवारी दुपारी १.३० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.१० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. या गाडयांना दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. 
     तसेच सीएसएमटी-मालदा टाउन साप्ताहिक विशेष गाडीच्या १० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र ०१०३१ साप्ताहिक सुपरफास्ट सीएसएमटी येथून १ मे ते २९ मे पर्यंत दर सोमवारी ११.०५ वाजता सुटेल आणि मालदा टाउनला तिसऱ्या दिवशी रात्री ००.४५ वाजता पोहोचेल. तर गाडी क्र ०१०३२ साप्ताहिक मालदा टाउन ३ मे ते ३१ मे पर्यंत दर बुधवारी १२.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ३.५० वाजता सीएसएमटी पोहोचेल. या गाडयांना दादर, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, किउल, अभयपूर, जमालपूर , भागलपूर, कहालगाव, साहिबगंज, बरहरवा आणि न्यू फरक्का याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. तसेच एलटीटी-करमाळी साप्ताहिक विशेष गाडीच्या १६ फेऱ्या होणार असून गाडी क्र ०१४५५ हि गाडी १५ एप्रिल ते ३ जूनपर्यंत दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी करमाळी येथे दुपारी २.३५ वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्र ०१४५६ विशेष गाडी १५ एप्रिल ते ३ जूनपर्यंत दर शनिवारी करमाळी येथून दुपारी ४.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ३.४५ वाजता पोहोचेल. या गाडयांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. याशिवाय एलटीटी-बनारस साप्ताहिक विशेष गाडीच्या १२ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र ०१०५३ साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस १ मे ते ५ जूनपर्यंत दर सोमवारी १२.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता बनारसला पोहोचेल. तर गाडी क्र ०१०५४ साप्ताहिक विशेष गाडी २ मे ते  ६ जूनपर्यंत दर मंगळवारी बनारसला रात्री ८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडयांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छेओकी याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. 
      दरम्यान, पुणे - दानापूर साप्ताहिक विशेष गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र ०१०३९ साप्ताहिक विशेष गाडी पुण्याहून ६ मे ते १७ जूनपर्यंत दर शनिवारी रात्री ७.५५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ४.३० वाजता दानापूरला पोहोचेल. तर गाडी क्र ०१०४० साप्ताहिक विशेष गाडी ८ मे ते १९ जूनपर्यंत दर सोमवारी ६.३० वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.३५ वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडयांना दौंड चोर मार्ग, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. यासोबत पुणे - एर्नाकुलम साप्ताहिक विशेष  गाडीच्या १४ फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र ०१०५० साप्ताहिक विशेष पुण्याहून १३ एप्रिल ते २५ मे पर्यंत दर गुरुवारी संध्याकाळी ६.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.५० वाजता एर्नाकुलमला पोहोचेल. तर गाडी क्र ०१०४९ साप्ताहिक स्पेशल एर्नाकुलम येथून १४ एप्रिल ते २६ मे पर्यंत दर शुक्रवारी रात्री ११.२५ वाजता सुटेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी २.४५ वाजता पोहोचेल. या गाडयांना लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुडाळ, उडुपी, मंगळुरू, कासरगोड, कन्नूर, थलासेरी, कोझिक्कोडे, तिरूर, शोरानूर जंक्शन आणि त्रिसूर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in