महाड अग्नितांडवात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू, दोन कामगार अजूनही बेपत्ता ; मृतांच्या नातेवाईकंना ४५ लाखांपर्यंत मदत

महाडमधील ब्लू जेट केमीकल कंपनीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती.
महाड अग्नितांडवात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू, दोन कामगार अजूनही बेपत्ता ; मृतांच्या नातेवाईकंना ४५ लाखांपर्यंत मदत

रायगड : महाड एमआयडीसीतील केमीकल कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. जवळपास १० तासनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. महाडमधील ब्लू जेट केमीकल कंपनीत शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली होती.

या कंपनीत आधी स्फोट होऊन आग लागली. त्यात ११ कामगार अडकल्याचं सांगण्यात येत होतं. तर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जे कामगार कंपनीत अडकले होते. त्यापैकी ९ जणांचे मृतदेह हाती आले आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ७ जणांचे तर तर आज(४ ऑक्टोबर) सकाळी २ कामगारांचे मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या स्फोटाची भीषणता लक्षात घेता काल NDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आलं होतं.

स्फोट झाल्यानंतर कंपनीत अडकलेल्या कामगारांचा पत्ता लागत नसल्याने एनडीआरएफचं पथक बोलवण्यात आलं होतं. हे पथक शुक्रवारी संध्याकाळी दाखल झालं. यानंतर सुरु केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये ४ मृतदेह हाती लागले होते. यानंतर एक-एक करत ३ मृतदेह हाती लागले होते. यानंतर आज सकाळी आणखी दोन मृतदेह हाती आल्याने ११ पैकी नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या शिंगे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आमि विमा कंपनीच्या माध्यमातून ९ ते १८ लाख रुपये, अशी एकूण ४५ लाख रुपयांपर्यंत मदत मिळवून देऊ, अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली आहे. याच बरोबर राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एमआयडीसीत जाऊन कामगारांच्या नातेवाईकांशी चर्चा करुन त्यांनी धीर दिला.

logo
marathi.freepressjournal.in