
खडकवासला धरण परिसरात पोहायला गेलेल्या नऊ मुली बुडाल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या नऊ मुलींपैकी सात मुलींना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र दोन मुलींचा मृत्यू झाला आहे. गोर्हे खुर्द तालुका हवेली गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी सात मुलींना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले, तर दोन मुली अद्याप बेपत्ता आहेत. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पीएमआरडीए अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. या संदर्भात संपूर्ण माहिती अजून समोर आली नाही