नागपुरच्या सोलर एक्सप्लोझिव कंपनीत भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
नागपुरच्या सोलर एक्सप्लोझिव कंपनीत भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

नागपुरच्या बाजारगाव येथील एका मोठ्या सोलर एक्सप्लोझिव कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्दैवी घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करतेवेळी हा स्फोट झाला.

या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या स्फोटाची तीव्रता किती होती याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी यात एक इमारत या घटनेत उध्वस्त झाल्याचं समजतं.

या घटनेची माहिती मिळतात परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आत पोहचूनच स्थिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

नागपूर येथील सोलर कंपनीत घडलेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिली. तसंच या दुख:द प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. स्फोट झालेली कंपनी ही संरक्षम दलासाठी ड्रोन आणि स्फोटके निर्माण करणारी कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नागपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात असून असून स्वत: IG, SP, जिल्हाधिकारी हे घटनास्थळी उपस्थित आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मृतांच्या नातेवाईकांकडून मोठा आक्रोश याठिकाणी सुरु आहे. पोलिसांकडून स्फोट झालेल्या कंपनीचा परिसर सील करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in