महाराष्ट्रात ९.५० कोटी मतदारांची नोंद; ३० ऑगस्टअखेर १७ लाख नवे मतदार

भारतीय निवडणूक आयोगाने ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.
महाराष्ट्रात ९.५० कोटी मतदारांची नोंद; ३० ऑगस्टअखेर १७ लाख नवे मतदार
Published on

मुंबई : मतदार यादीत १६ लाखांहून अधिक नवीन मतदारांची नोंदणी झाल्यामुळे महाराष्ट्रात आता जवळपास ९.५० कोटी मतदार आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी पात्र आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाने ३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली. या मतदार यादीनुसार, राज्यात ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ मतदार आहेत. यामध्ये ४ कोटी ९३ लाख ३३ हजार ९९६ पुरुष तर ४ कोटी ६० लाख ३४ हजार ३६२ महिला मतदार आहेत. ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या राज्यात ५ हजार ९४४ आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मतदार यादीत १६ लाख ९८ हजार ३६८ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. १८ ते १९ वयोगटातील १८.६७ लाख मतदार, २० ते २९ वयोगटातील १.८१ कोटी आणि ८० वर्षे व त्यावरील २५.४० लाख मतदार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in