Budget 2024: धोरण, व्हिजन नसलेला अर्थसंकल्प -नाना पटोले

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही.
Budget 2024: धोरण, व्हिजन नसलेला अर्थसंकल्प -नाना पटोले
Published on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटची काळजी घेतलेली दिसते.

देशात बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतूद नाही. एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघु, छोटे व मध्यम उद्योगासह सर्वसामान्यांची निराशा केली आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत. यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी केंद्रात काही पत नाही, हे स्पष्ट झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पाने शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या बहुसंख्य जनतेची घोर निराशा केली आहे. शेतमालाच्या हमीभावाचा मोठा प्रश्न आहे, त्याला कायदेशीर हमी देण्याबाबत अर्थमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासंदर्भात योजना नाही. असेही पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in