युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

त्रासाला कंटाळुन जयश्रीने ११ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली.
युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

नांदेड : युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आपले लग्न दुसरीकडेच जमवल्यानंतर त्या युवतीने आत्महत्या केली. याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जयश्री सुभाष जाधव (२०) असे मृताचे नाव आहे. रमनवाडी तांडा येथील सुदाम जाधव यांनी पोलीसात तक्रार दिली आहे. यातील आरोपीने मुलीवर प्रेम करून लग्न करतो, असे वारंवार सांगून दुसरीकडे सोयरीक करून घेवुन वारंवार पिडीत मुलीस त्रास दिल्याने व इतर आरोपीतांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन जयश्रीने ११ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करणेस यातील आरोपीतांनी प्रवृत्त केले.

याप्रकरणी सुदाम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी पवन उर्फ राजू सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनु दिलीप आडे अशा चार जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in