Jitendra Awhad : ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार पदाचा राजीनामा देणार ?

ती महिला इतर लोकांसमवेतच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा हात धरून बाजूला ढकलले.
Jitendra Awhad : ठाण्यात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल, आमदार पदाचा राजीनामा देणार ?

ठाण्यातील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 354 (महिलेचा अपमानजनक विनयभंग) अंतर्गत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विट करत त्यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले.

13 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंब्रा-शिळफाटा वाय-जंक्शन उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी आले असता, ती महिला इतर लोकांसमवेतच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना जितेंद्र आव्हाडांनी त्यांचा हात धरून बाजूला ढकलले. महिलेच्या म्हणण्यानुसार आणि व्हिडिओच्या आधारे या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड म्हणाले, "पोलिसांनी माझ्यावर ७२ तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केले आहेत आणि तेही भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत. मी पोलिसांच्या या क्रूरतेविरुद्ध लढेन. मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, असे देखील त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in