आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एस.एस.टी. चेक पोस्ट उनकेश्वरचे पथक प्रमुख एस. पी. जाधव यांना सोमवारी एका वाहनाच्या तपासणी दरम्यान, एका पक्षाच्या चिन्हासहित लिहिलेले वाहन आढळले. पथकाने विचारपूस केल्यावर वाहन मालक रावसाहेब जगदेवराव शिंदे (रा. गुंडा, ता. कंधार) याच्याकडे निवडणूक प्रचाराचा परवाना नसल्याचे समजले.
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नांदेड : किनवट तालुक्यातील मांडवी येथे पोलिसांनी विनापरवाना बॅनर व एलईडी स्क्रीन लावून प्रचार करणारे वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मालक व चालकावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता भंग केल्याच्या या पहिल्या गुन्ह्याची नोंद किनवट मतदारसंघात झाली आहे.

एस.एस.टी. चेक पोस्ट उनकेश्वरचे पथक प्रमुख एस. पी. जाधव यांना सोमवारी एका वाहनाच्या तपासणी दरम्यान, एका पक्षाच्या चिन्हासहित लिहिलेले वाहन आढळले. पथकाने विचारपूस केल्यावर वाहन मालक रावसाहेब जगदेवराव शिंदे (रा. गुंडा, ता. कंधार) याच्याकडे निवडणूक प्रचाराचा परवाना नसल्याचे समजले. त्यावरून जाधव यांनी मांडवी पोलिस स्टेशन अंतर्गत स्थापित एफ.एस.टी. पथक प्रमुख कोंडबा सिडाम यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनीही घटनास्थळी पोहचून चौकशी केली असता वाहनाचे मालक रावसाहेब शिंदे व चालक बालाजी गोविंद शिंदे यांच्याकडे निवडणूक आचारसंहिते दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक असतानाही त्यांनी कुठलीही परवानगी न घेताच प्रचार करत असल्याचे दिसले.

logo
marathi.freepressjournal.in