शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांना मुख्याध्यापकाला केलेली मारहाण चांगलीच भोवण्याची शक्यता आहे. आमदार बांगर याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच कॉलेजच्या पाच अधिकाऱ्यांसह 30 ते 40 जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीनंतर तब्बल 10 दिवसांनी आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार बांगर यांनी त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेचीही तोडफोड केली. यात पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
नेहमी कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहणारे कळमनुरी येथील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हिंगोली शहराजवळील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार बांगर यांनी मारहाण केली. व्हिडिओमध्ये आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्तेही मुख्याध्यापकांचे कान पकडून मारहाण करत असल्याचे दिसले.
संतोष बांगर नेहमीच वादांमुळे चर्चेत असतात संतोष बांगर हे नेहमीच वादांमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी संतोष बांगर याने कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. 27 ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयाकडे जात होते. त्यांच्यासोबत 15 कार्यकर्तेही होते. मात्र, गेटवर ड्युटीवर असलेल्या पोलिसाने पासबाबत विचारणा केली असता आमदार बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती.